भव्य मशाल रॅलीने नांदेड शहरात ऑलिम्पिक सप्ताहाला प्रारंभ

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 67 Views
Spread the love

ऑलिम्पिक दिन रॅलीत हजारो खेळाडूंसह मान्यवरांचा सहभाग

नांदेड ः क्रीडा क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्याचे जगभरामध्ये नाव उंचावण्याच्या दृष्टीने नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन काम करत आहे. जिल्ह्यात ऑलिम्पिक सप्ताह २३ ते २९ जून या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाची नांदेडमध्ये हजारो खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मान्यवरांसह खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

जगभरातील खेळाडूंचा मोठा उत्सव मानला जाणारा ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी खेळल्या जातात. या स्पर्धेचे यजमानपद २०३६ मध्ये भारताला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये देशभरासह नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून देशाचा अभिमान वाढवण्याची संधी आहे. त्यादृष्टीने नांदेड येथे ऑलिम्पिक असोसिएशन, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नांदेड येथे २३ ते २९ जून दरम्यान ऑलिम्पिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित भव्य रॅलीचे उद्घाटन बाबा बलविंदरसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ हंसराज वैद्य, डॉ दीपक बच्चेवार यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात जुना मोंढा टॉवर ते क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड करण्यात आले होते.

या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीने देशाची मान उंचावली जावी यासाठी असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित संघटनेचे चेअरमन जनार्दन गुपिले यांच्यासह कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, अध्यक्ष सरदार जसविंदर सिंग रामगडिया, सचिव डॉ राहुल वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी पाटील जोगदंड, डॉ रमेश नांदेडकर, विक्रांत खेडकर, विनोद गोस्वामी, रमण बईनवाड, डॉ व्ही एम कळमसे, कोषाध्यक्ष प्रा जयपाल रेड्डी, सहसचिव वृषाली पाटील जोगदंड, डॉ राजेश जांभळे, डॉ दिनकर हंबर्डे, असगर अली पटेल, विनोद जमदाडे, कुलदीपसिंग जाट तथा सदस्य बाबुराव कंधारे, राष्ट्रपाल नरवाडे, ज्ञानेश्वर सोनसळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संजय बेतिवार, बालाजी सिरसीकर, संजय चव्हाण, राहुल सिंग चंदेल, किरण नागरे, शिवाजी जाधव, सुभाष कुरे, वैजनाथ नावंदे, आकाश मुगल, प्रसंजीत जाधव, विनश्री गडगिळे, प्रियंका गायकवाड, नेहा घाडगे, कोमल गड्डमवार प्रभाकर पेठवडकर, विष्णू पूर्ण, ऋषिकेश टाक, वैभव दमकोंडवार यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *