
छत्रपती संभाजीनगर ः एमजीएम क्लोवर डेल शाळेमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महात्मा गांधी संचालित क्लोवर डेल शाळेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला. २३ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने क्लोवर डेल शाळेमध्ये तिसरी वर्गाच्या असेम्बली मध्ये सखोल माहिती मुलांना देण्यात आली.
ऑलिम्पिक दिवस कशासाठी साजरा करतात, त्याचे महत्व काय आहे, किती वर्षानंतर ऑलिम्पिक होते या विषयी सखोल माहिती देण्यात आली. या दिवशी जगभरातील लोक ऑलिम्पिक मूल्यांचा, खेळाचा, तंदुरुतीचा आणि समुदायाला एकत्र आणण्याचा उत्सव साजरा करतात. त्या निमित्ताने शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या विशेष उपक्रम प्रसंगी एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, शाळेच्या संचालक डॉ अपर्णा कक्कड, उपसंचालक डॉ नम्रता जाजू, शाळेचे प्राचार्या रितेश मेहता, उपप्राचार्या वर्षा पोदार यांच्यासह शाळेचे क्रीडा शिक्षक सागर शेवाळे, प्रिया गायकवाड, अंकुश समाधान त्यासोबत पर्यवेक्षक, सांस्कृतिक विभाग सहकारी उपस्थित होते.