ऋषभ पंतने रचला नवा इतिहास; सलग दुसऱ्या डावात ठोकले शतक

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पंत पहिला भारतीय 

हेडिंग्ले : भारतीय संघाचा उपकर्णधार आणि धमाकेदार फलंदाज ऋषभ पंत याने सलग दुसऱ्या डावात शतक ठोकून इतिहास रचला. पंतने आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आणि केवळ १३० चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. यांसह पंतने विक्रमांची एक झुंबड उडवली.

ऋषभ पंतने पहिल्या डावात १४६ चेंडूत त्याचे सातवे कसोटी शतक पूर्ण केले होते. आता यात सुधारणा करत त्याने १३० चेंडूत त्याचे आठवे कसोटी शतक पूर्ण केले. यासह, पंत इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. याशिवाय, तो कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा सातवा भारतीय आहे.

अशी कामगिरी करणारा पंत दुसरा यष्टिरक्षक ठरला

पंत अँडी फ्लॉवर नंतर कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला. झिम्बाब्वेच्या या महान फलंदाजाने २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात १४२ धावा आणि दुसऱ्या डावात १९९ धावा अशा नाबाद खेळी केल्या. आता पंतने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात १३४ धावा आणि दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या.

पंतने फ्लिंटॉफ आणि स्टोक्सची बरोबरी केली

२७ वर्षीय फलंदाजाने दुसऱ्या डावात १४० चेंडूंचा सामना केला आणि १५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी केएल राहुलसोबत १९५ धावांची मोठी भागीदारी केली. बशीरच्या गोलंदाजीवर तो जॅक क्रॉली याच्या हाती झेलबाद झाला. पंतने दोन्ही डावात एकूण नऊ षटकार मारले. यासह त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात नऊ षटकार मारणाऱ्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि बेन स्टोक्स यांच्याशी बरोबरी केली. फ्लिंटॉफने एजबॅस्टन येथे (२००५) ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला तर बेन स्टोक्सने लॉर्ड्स येथे (२०२३) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण नऊ षटकार मारले.

पंत सातवा परदेशी फलंदाज 

पंतने यापूर्वी ८३ चेंडूत आपले सातवे अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध सलग पाचव्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. तो इंग्लंडमध्ये सलग पाचव्यांदा ५० पेक्षा जास्त धावा करणारा सातवा परदेशी फलंदाज ठरला. या बाबतीत स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानावर आहे, ज्याने हा पराक्रम सात वेळा केला आहे.

भारतासाठी कसोटीच्या प्रत्येक डावात शतक झळकावणारे फलंदाज

विजय हजारे 

सुनील गावस्कर (३ वेळा)

राहुल द्रविड (२ वेळा)

विराट कोहली

अजिंक्य रहाणे

रोहित शर्मा

ऋषभ पंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *