किरॉन पोलार्डने इतिहास रचला, ७०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू

  • By admin
  • June 24, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

नवी दिल्ली ः वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू किरॉन पोलार्ड याने टी २० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. तो ७०० टी २० सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

पोलार्ड सध्या अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो एमआय न्यूयॉर्क संघाचा भाग आहे. २४ जून रोजी एमएलसी २०२५ च्या १४ व्या सामन्यात न्यूयॉर्क संघाचा सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नशी झाला. या हंगामात निकोलस पूरन न्यूयॉर्कचे नेतृत्व करत आहे.

ऐतिहासिक कामगिरी
किरॉन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो या यादीत आहे. ब्राव्होने त्याच्या कारकिर्दीत ५८२ टी २० सामने खेळले. त्याच वेळी, पाकिस्तानचा शोएब मलिक ५५७ सामन्यांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची नावे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आंद्रे रसेल ५५६ सामन्यांसह यादीत चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत ५५१ टी २० सामने खेळणारा सुनील नरेन या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

कायरॉन पोलार्डची टी २० मधील आकडेवारी

पोलार्डने आतापर्यंत टी २० क्रिकेटमध्ये ३१.३४ च्या सरासरीने १३६३४ धावा केल्या आहेत. या स्वरूपात त्याचा स्ट्राइक रेट १५०.४१ आहे. पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये १ शतक आणि ६१ अर्धशतके केली आहेत. मेजर लीग क्रिकेटच्या चालू हंगामात पोलार्डची कामगिरी संमिश्र राहिली आहे. पोलार्डने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांपैकी ४ डावांमध्ये ३२.३३ च्या सरासरीने ९७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १९०.१९ राहिला आहे. तथापि, या हंगामात तो गोलंदाजीत एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, एमआय न्यूयॉर्क संघाने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त १ जिंकता आला आहे.

टी २० स्वरूपात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

कायरॉन पोलार्ड : ७०० सामने

ड्वेन ब्राव्हो : ५८२ सामने

शोएब मलिक : ५५७ सामने

आंद्रे रसेल : ५५६ सामने

सुनील नरेन : ५५१ सामने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *