खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता एक्सलन्ट तायक्वांदो अकॅडमीचे खेळाडू रवाना

  • By admin
  • June 24, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

मुंबई ः हैदराबाद तेलंगणा येथील गच्चीबोली स्टेडियम येथे २५ ते २७ जून या कालावधीत होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटना एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंचा सहभाग होणार आहे. 

या स्पर्धेत भारतातून खेळाडू पीवी ग्रुप, सब ज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर क्योरुगी व पूमसे प्रकारात मुला-मुलींची स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्रातील मिरा रोड ठाणे येथील एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीच्या संघासोबत प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व संघ व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, ज्योती भारुड रवाना झाले आहेत.

या स्पर्धेत  क्युरोगी प्रकारात  सक्षम भारुड, मंथन वापीलकर, अन्विता सावंत, स्वरा मोहिते, अमृता कुलकर्णी हे खेळाडू सहभागी होणार आहेत. पूमसे प्रकारात अन्विता सावंत, स्वरा मोहिते, अमृता कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. 
सहभागी खेळाडूंचे व प्रशिक्षक गजेंद्र गवंडर, कांचन गवंडर तसेच संघ व्यवस्थापक यांचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक, निशा नार्वेकर (जिल्हा संघटक मीरा-भाईंदर शिवसेना),  सचिन मांजरेकर (विभाग प्रमुख शिवसेना) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष निरज बोरसे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, दुलिचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेश करा, अजित घारगे, विजय कांबळे, सतीश खेमस्कर, एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक निरज बोरसे, लता कलवार ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय मुख्याध्यापिका दीक्षित खान शिक्षिका निदा शेख, मुख्याध्यापिका मार्जोरी ऑगस्टीन, धनंजय, वर्गशिक्षिका सुषमा जैस्वाल यांनी, नारायणा स्कूल मुख्याध्यापिका सुप्रीती काटकर, मुख्याध्यापिका सुप्रिया मस्तुद, क्रीडा शिक्षक धीरज लोके, एल आर तिवारी यांनी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे  हैदराबाद तेलंगणा होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *