
थायलंड येथे आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः बँकॉक (थायलंड) येथे १९ व २० जून रोजी पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या १४ स्केटर्सनी ‘टीम इंडिया’चे प्रतिनिधित्व करत जबरदस्त कामगिरी बजावली. या स्पर्धेत भारतीय स्केटर्सनी एकूण २८ पदकांची कमाई केली असून त्यात १० सुवर्ण, ९ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.
ही स्पर्धा रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (आरआरएसएफआय) व एमटीएल इनडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केटिंगच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे प्रमुख आयोजक व संस्थापक सचिव भिकन अंबे हे होते. सह-आयोजक म्हणून मनियटीलोर अकॅडमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तांत्रिक अधिकारी म्हणून थायलंडचे कॅपकप सर, मिस नॉन आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रमुख राधिका अंबे व पवन अग्रवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय संघाचे नेतृत्व पूजा अंबे यांनी प्रशिक्षक म्हणून यशस्वीरित्या पार पाडले. त्यांच्यासोबत गणेश कदम रोडे, प्रशांत मंगलारप, दीपेश सोनार आणि पीयूष दाभाडे हे आरआरएसएफआय सदस्य देखील उपस्थित होते. टीम मॅनेजर म्हणून संपूर्ण संघाची जबाबदारी चंद्रशेखर घुगे यांनी पार पाडली.
या स्पर्धेसाठी खेळाडूंबरोबर १० ते २० पालकांनीही थायलंडमध्ये उपस्थित राहून आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले. पालकांचा सततचा उत्साह आणि उपस्थिती यामुळे खेळाडूंना आत्मविश्वास मिळाला. त्यांनी खेळाडूंना सगळ्या स्पर्धांमध्ये प्रोत्साहित करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. पालकांमध्ये रोहन कुलकर्णी, ज्योती पिंटो, आनंद सोनवणे, ज्योती सोनवणे, श्रीषा थोता, कुमारराजा थोता, राजू मार्तंड, प्रतिभा मार्तंड, ओजस्विता कुलकर्णी, प्रतिभा इंगळे, सुनीता घुगे, आणि गीता जाधव यांचा समावेश होता.
या यशस्वी आयोजनानंतर विविध मान्यवरांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले. रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष किशोर जाधव, कोषाध्यक्ष नितीन कथोडे, संगीता भट्टड, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, अमृत बिऱ्हाडे, सायकलिंग असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा संजय साठे, साई नाथ थोरात, ऑलिम्पिक संघटनेचे पंकज भारसाखळे, उदय डोंगरे, गोविंद शर्मा, गणेश बनसोडे, दीपक चव्हाण, शांतीलाल चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी व सर्व विजेत्या स्केटर्सचे व सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव भिकन अंबे यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करत, “ही स्पर्धा केवळ खेळ नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्केटिंग क्षमतेचे प्रतीक आहे,” असे गौरवोद्गार काढले.
पदक विजेते स्केटर्स
श्रेयस राजू मार्तंड, प्रथमेश अतुल इंगळे, सान्वी आनंद सोनवणे, तीर्थराज मंगेश पाटील, स्पृहा रोहन कुलकर्णी, संजीत संजय पाटील, स्नेहजीत संजय पाटील, पृथ्वीराज हेमंत जाधव, यथवैत नंदन कुमार थोटा, नियती डॅरियल पिंटो, आरुष शांतीलाल चव्हाण, भावेश गुरव, आरीन उत्तुरकर, साई भिकन अंबे.