राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सोलापूरचे १० जण उत्तीर्ण

  • By admin
  • June 24, 2025
  • 0
  • 225 Views
Spread the love

सोलापूर ः कराड येथे एसएमजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा घेण्यात आली. या पंच परीक्षेत राज्यातील १२२ जणांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत सोलापूरच्या १० जणांनी यश संपादन केले.

ही पंच परीक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आली. या पंच परीक्षेत श्रीकांत पुजारी, महेश गावडे, स्नेहदीप व्यवहारे, आबासाहेब वाघमोडे, अनंत उंबरदंड, परवेज शेख, राज माळी, विकास घोडके, अजित कोळेकर, ओंकार नलवडे यांनी यश संपादन केले. सर्व उत्तीर्ण पंचांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव गफार पठाण, खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी, प्रमोद दौंडे, वाजिद शेख यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *