राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत दिल्ली, तामिळनाडू विजेते

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

मुंबई ः शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या ३०व्या राष्ट्रीय थ्रोबॉल सब ज्युनियर स्पर्धेत दिल्ली आणि तामिळनाडू संघांनी विजेतेपद पटकावले.

थ्रो बॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि महा थ्रो बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ३०वी राष्ट्रीय थ्रोबॉल सब ज्युनिअर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, महा थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दर्शील मनोज कोटक, थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार टी बाला विनायक, महा थ्रोबॉल असोसिएशनचे महासचिव राहुल वाघमारे, उपाध्यक्ष डॉ राकेश तिवारी, अमोल सावंत, प्रियंका धुरी, बाबा गायकवाड, उपाध्यक्ष दिनेश अहिरे, शांताराम नाईक, दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ राकेश तिवारी यांनी केले. दीपक कदम यांनी आभार मानले.

शिर्डी येथे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत २० राज्यांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय थ्रोबॉल सब ज्युनिअर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव नरेश मान व खजिनदार टी बाला विनायक, महा थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दर्शील मनोज कोटक व महासचिव राहुल वाघमारे, खजिनदार प्रियांका धुरी, संचालक दीपक कदम, अमोल सावंत, पैलवान सागर जाधव, बाबा गायकवाड, विशाल पवार, मनोज मल्हार, कुशल प्रजापती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अंतिम निकाल

मुलांचा गट ः १. दिल्ली, २. मध्य प्रदेश, ३. तामिळनाडू व हरियाणा.

मुलींचा गट ः १. तामिळनाडू, २. दिल्ली, ३. केरळ आणि ओडिशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *