क्रीडा प्रबोधिनीसाठी खेळाडूंची गुरुवारी निवड चाचणी

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

हँडबॉल, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो खेळांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर ः शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींसाठी सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. विविध खेळांची निवड चाचणी प्रक्रिया २६ जून रोजी शहरात राबवण्यात येणार आहे.

हँडबॉल खेळाची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुलावर घेण्यात येईल. या संदर्भात तुषार आहेर (९०२८५०३८०३), सागर तांबे (८३८३१००५५०३) यांच्याशी संपर्क साधावा.

जलतरण खेळाची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ जलतरण तलावावर घेण्यात येणार आहे. या संदर्भात सचिन पुरी (८६०५०१२७०७) व अभय देशमुख (९८५००३६३६३) यांच्याशी संपर्क साधावा.

सायकलिंगची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे. या चाचणी संदर्भात पुनम नवगिरे (९९२१५६४३६८), चरणजित सिंग संघा (९८९०३८३७१४) यांच्याशी संपर्क साधावा.

फुटबॉल खेळाची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. या संदर्भात तुषार आहेर व निसार शेख (७३५०७८५७८३) यांच्याशी संपर्क साधावा.

ज्युदो खेळाची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ज्युदो संघटनेच्या किटली गार्डन येथील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. या संदर्भात पूनम नवगिरे व विश्वास जोशी (९९२३४०८१४९) यांच्याशी संपर्क साधावा.

जिम्नॅस्टिक्स खेळाची निवड चाचणी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर घेण्यात येणार आहे. या संदर्भात शिल्पा मोरे (९०२१०३२३७३) व तनुजा गाढवे (७६२०३९०३५३) यांच्याशी संपर्क साधावा.

महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळूंगे-बालेवाडी-पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर ९ क्रीडा प्रबोधिनी करीता सरळप्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत.

या निवड चाचणीसाठी हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स अशा सहा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या निवड चाचणीत १९ वर्षांआतील मुले व मुली, संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर​ असावा.​ या निवड चाचणीत पात्र खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. तसेच खेळाडूंनी संबंधित खेळाचे प्रमाणपत्र, जन्मदाखला, निर्गम उतारा, आधारकार्ड घेऊन २६ जून रोजी सकाळी ११ वाजता चाचणी स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *