सेंट मीरा महाविद्यालयात योग दिनानिमित्त योग सत्राचे आयोजन

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

पुणे ः सेंट मीरा महाविद्यालयात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात योग मार्गदर्शक गोपाळ गुरव यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रम दोन सत्रांमध्ये घेण्यात आला. पहिल्या सत्रात गोपाळ गुरव यांनी विद्यार्थिनींना योगाची गरज, त्याचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात योगाचे प्रात्यक्षिक सत्र घेऊन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष योगाभ्यास शिकवण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थिनींना योगाचे शारीरिक व मानसिक फायदे समजावून देणे हा होता. यासाठी त्यांना कुठल्या आसनांचा शरीरावर कसा फायदा होतो, हे प्रत्यक्ष आसने करून घेत सांगितले. त्याचबरोबर त्यांना प्राणायामाचे महत्त्व विषद केले गेले आणि त्यांच्याकडून प्राणायाम करूनही घेतला गेले. वयात येणाऱ्या मुलींना त्यांना धारणा-ध्यानचे महत्त्व समजून सांगितले. ध्यानाचे परिणाम विद्यार्थींनी प्रत्यक्ष कृतीने अनुभवले. गोपाळ गुरव हे योग क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक असून, त्यांच्या सत्रामुळे विद्यार्थिनींना निश्चित प्रेरणा व योग्य दिशा लाभली. 

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ निरू भगत यांचे सक्रिय प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ एकता जाधव यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ सुवर्णा देवळाणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या योग सत्रास महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्गाने सहभाग नोंदवला. योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *