
नाशिक ः टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल सभागृहात राष्ट्रीय टेनिस क्रिकेट पंचपरीक्षा उत्साहात संपन्न झाली.
राष्ट्रीय पंच परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर व भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेनिस टेनिस टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस खेळाबद्दल माहिती व महत्त्व सांगितले. तसेच भारतीय महासचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना पंच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना दोन दिवसीय पंच परीक्षेमध्ये टेनिस क्रिकेट खेळाची नियमावली व नियम व प्रॅक्टिकल करून दाखवले.
यामध्ये भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांनी पंच परीक्षेसाठी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये धनश्री गिरी, दर्शन थोरात, नंदकिशोर नाईक यांनी ए प्लस ग्रेड मिळून भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास गिरी, नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव विलास गायकवाड, धनंजय लोखंडे यांनी अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.