शौर्य, आर्यन, मल्हार, अक्षरा, धैर्य, याशिका, मंजू, गीता अव्वल

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 118 Views
Spread the love

विभागीय योगासन स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विभागीय योगासन स्पर्धेत शौर्य जांभळे, आर्यन थोरात, मल्हार बनसोड, अक्षरा काळे, धैर्य साळवे,, याशिका खराटे, शौर्य फटाळे, गीता भोजने, मंजू गिरी यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद संपादन केले.

गरवारे कम्युनिटी सेंटर येथे विभागीय योगासन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर, राजेश मिरकर, रमाकांत रैातल्ले. शिल्पा कुलकर्णी, वैजनाथ डोमाळे, दिनेश देशपांडे, पूजा सदावर्ते, पवन बोराडे, दीपाली शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय योगासन स्पर्धेचा अंतिम निकाल

८ वर्षांखालील मुली ः १. अक्षरा काळे, २. निधी बारबायले, ३. आरोही चौधरी, ४. तेजू पूर्व गोल, ५. देवांशी इंगळे.

८ वर्षांखालील मुले ः १. धैर्य आळवे, २. ओम जाधव, ३. नैतिक गाढवे, ४. शिवांश पाटील, ५. अबीर वाठोरे.

१० वर्षांखालील मुले ः १. मल्हार बनसोड, २. पार्थ घाडगे, ३. अर्णव श्रीधरकर, ४. साई वैद्य, ५. शाश्वत पुराणिक.

१० वर्षांखालील मुली ः १. याशिका खराटे, २. आचल राठोड, ३. काव्या राजवाडकर, ४.अद्या खजिने, ५. राशी गणाचार्य.

१२ वर्षांखालील मुली ः १. शौर्य फटाळे, २. दक्ष जाधव, ३. विनाग टाकळकर, ४. जय डाखोळे, ५. आढाव पायनीकुमार.

१४ वर्षांखालील मुली ः १. गीता भोजने, २. पूजा सोनवणे, ३. अनुष्का कानडे, ४. अनुष्का चव्हाण, ५. कृशाली मोरे.

१४ ते १८ वयोगट मुली ः १. शौर्य जांभळे, २. स्नेहल मुंडे, ३. आर्या जांभळे, ४. वैष्णवी शर्मा, ५. अपेक्षा अवचरमल.

१४ ते १८ वयोगट मुले ः १. आर्यन थोरात, २. सुशांत कांबळे, ३. हर्ष मेड.

१८ ते २८ वयोगट मुली ः १. वैभवी कडवाडे.

२८ ते ३५ वयोगट महिला ः १. जानवी तांबडे, २. अलका मोहिते, ३. प्रियंका जाधव.

३५ ते ४५ वयोगट महिला ः १. मंजू गिरी, २. शीतल टाकले, ३. रीना खोपसे. ४. योती नांनदे, ५. शिल्पा बोर्डे.

१८ ते २८ वयोगट पुरूष ः १. साईराम निंबेकर, २. सोमनाथ महाजन, ३. नागराज शिंदे.

२९ ते ३५ वयोगट पुरूष ः १. सुरज बनकर.

३५ ते ४५ पुरुष गट ः १. ज्ञानेश्वर काळे.

४६ ते ५५ पुरूष गट ः १. सचिन धोत्रे, २. लक्ष्मीकांत फटाले.

४५ ते ५५ वयोगट महिला ः १. संध्या बोधेकर, २. सुवर्णा बद्मोरे, ३. पल्लवी भागवत.

५५ वर्षावरील महिला ः १. निशिगंधा महाजन, २. अनिता कदम, ३. शोभा बडघवर.

५५ वर्षांवरील पुरुष ः १. जगन्नाथ कुलकर्णी, २. रवींद्र धामणगावकर, ३. दिलीप जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *