शांभवी चषक अंडर १४ क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 69 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या अंडर १४ मुलांच्या एक दिवसीय स्पर्धेला भंडारी मैदान जुळे सोलापूर या ठिकाणी शानदार सुरुवात झाली आहे.

ही स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार जे टी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरू केली आहे. ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शनने पुरस्कृत केली आहे.
२५ जून रोजी या स्पर्धेचे उद्घाटन शांभवी कन्स्ट्रक्शनचे मालक युवराज मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जितेश कुलकर्णी उपस्थित होते.

या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबार्सो, १४ वर्षांखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, सदस्य विक्रांत पवार, सदस्य सत्यजित जाधव, टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, खजिनदार संतोष बडवे, २३ वर्षांखालील मुलांचे निवड समिती चेअरमन शिवानंद अकलूजकर, योगेश कोम्पल, निलेश गायकवाड, राजू रंगम हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *