राज्य बॉक्सिंग स्पर्धेत जळगावच्या दिशा पाटीलला  सुवर्णपदक 

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

जळगाव ः महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ऍड हॉक कमिटी मार्फत वरोरा, चंद्रपूर येथे आयोजित महिला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ५७ ते ६० किलो वजन गटात जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनची खेळाडू दिशा विजय पाटीलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक प्राप्त केले.

बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्या लढतीत आपुलकी रुके (पुणे), पुनम कैथवास, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू (अकोला) आणि अंतिम फेरीत रुचिका वरते (वर्धा) या खेळाडूंना पराभूत करुन दिशा हिने सुवर्णपदक पटकावले आहे. 
दिशा पाटीलला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ सचिन वाणी, डॉ सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश मु पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, विशाल सोनावणे व शारदा पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *