
मुंबई ः जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-जीआयसी आंतर कार्यालयीन कॅरम स्पर्धेमध्ये एकेरीत गणेश चोरढेकर तर दुहेरीत विकास कुमार-पकिर बशीर जोडी विजेती ठरली.
प्रारंभी १-० अशी आघाडी घेणाऱ्या कुमार आशिषला अर्धा तास रंगलेल्या सामन्यात गणेश चोरढेकर याने संयमी अचूक खेळ करीत ५-३ असे चकविले आणि ७८ खेळाडूंच्या एकेरी स्पर्धेचे विजेतेपद हासील केले. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन एन रामास्वामी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हितेश जोशी, जीएम राजेश खडतरे, जीएम संजय मोकाशी, डीजीएम विजय साळवे, डीजीएम लता श्रीजित आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या गौरविण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने जीआयसी स्पोर्ट्स क्लब आयोजित दुहेरी कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखणाऱ्या विकास कुमार व पकिर बशीर जोडीने बलाढ्य गणेश चोरढेकर व कुमार आशिष जोडीला ११-० असे पराभूत करून अजिंक्यपद पटकाविले. परिणामी ४४ जोड्यांच्या कॅरम स्पर्धेत गणेश-कुमार जोडीला अंतिम उपविजेते, भावना भल्ला-अभिषेक पारकर आणि ज्योती सर्वानन-शीला आजगावकर जोडीला उपांत्य उपविजेते तर प्रणीत वर्मा-सुभाष कुमार, कार्तिक गेहलोत-कविता शेट्टी, सुमित-रोहित सुंदरसन, प्रभात बिंजोला-गोविंद सिन्हा जोड्यांना उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळाले.
एकेरीत निखिल केसुर व रश्मी पवार उपांत्य उपविजेते आणि अलोक पटेल, अंकुश कदम, शुभम जावळेकर, अक्षय रामास्वामी आदी उपांत्यपूर्व उपविजेते ठरले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जीआयसी स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी जॉन गायकवाड, कॅरम विभाग सेक्रेटरी सौरभ उर्कुडकर, सुरज सुवर्णा, दीक्षा जैन आदी पदाधिकारी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण कार्यरत होते.