
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन व स्पर्श क्रीडा मंडळ यांच्या वतीने ऑलिम्पिक दिनानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर दैनंदिन खो-खो खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंना शालेय साहित्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त, जिम्नॅस्टिक्स तसेच मराठवाडा शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य मकरंद जोशी यांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र पोलिस पदक पुरस्कार प्राप्त कबड्डीचे माजी खेळाडू शिवाजी कचरे यांचा सत्कार मकरंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार अॅड गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, आशिष कान्हेड यांची उपस्थिती होती. खेळाडूंना शालेय साहित्य वाटप करताना श्रीपाद लोहकरे, शिवाजी पवार, दत्ता कोल्हारे, शुभम सुरळे, राहुल नाईकनवरे, संदेश चितलकाळ, तसेच पालक यांची उपस्थिती होती.