नांदेड जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रतिसाद

  • By admin
  • June 27, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

नांदेड ः ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडतर्फे आयोजित ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहामध्ये विविध अशा क्रीडा संघटनेमार्फत स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन वेटलिफ्टिंग ट्रेनिंग सेंटर वजीराबाद (हनुमान पेठ) येथे माजी क्रीडा संचालक डॉ विठ्ठल सिंह परिहार यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर कळमसे, सचिव डॉ राहुल वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी जोगदंड, सदस्य राष्ट्रपाल नरवाडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष जसविंदर सिंग रामगडिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *