श्री कुलस्वामिनी विद्यालयामध्ये योग दिन उत्साहात संपन्न 

  • By admin
  • June 27, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

धाराशिव ः तुळजापूर येथील श्री कुलस्वामिनी विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त श्री कुलस्वामिनी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ताडासन, वृक्षासन वज्रासन, भद्रासन, त्रिकोणासन, पद्मासन, ओमकार इत्यादी सर्व प्रकार विद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा विभाग प्रमुख अनिल धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक सिद्धेश्वर कबाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दगडू भालेराव, शेळके, बालाजी कोने, धनाजी राऊत, शशिकांत गवळी, प्रदीप बिराजदार, राजू ससाणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सिद्धेश्वर कबाडे यांनी केले. दिलीप भालेराव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *