
सेलू ः महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने नाशिक येथे २८ ते ३० जून दरम्यान राज्य सिनियर पुरुष महिला सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी सेपक टकरा असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा सेपक टकरा पुरुष संघाची निवड चाचणी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे घेण्यात आली. या प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश भिसे व क्रीडा शिक्षक माणिक मगर, गणेश माळवे, कैलास टेहरे उपस्थित होते.
सेलू येथील नूतन विद्यालयात प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. परभणी जिल्हा पुरुष संघ राज्य सेपक टकरा स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना झाला आहे. परभणी जिल्हा सेपक टकरा संघात अनुराग आंबटी, विजय चौधरी, निलेश बानाटे, साई पोफळे, रामराव कांदे, आर्यन गायके, निलेश काळके, पांडुरंग केंद्रे, जगदीश लहाने, गणेश आम्ले भिसे जितेश, ऋषिकेश मुंढे, शुभम पवार, ईश्वर अर्जुन, विनोद सोळंके यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक कैलास टेहरे हे आहेत.
राज्य स्पर्धेसाठी जिल्हा अध्यक्ष राजेश विटेकर, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे, मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, सज्जन जैस्वाल, प्रशांत नाईक, अब्दुल अन्सार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.