
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत भंडारी मैदान येथे झालेल्या मास्टर्स क्रिकेट क्लब विरुद्ध सोलापूर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात मास्टर क्रिकेट अकॅडमीने सोलापूर स्पोर्ट्सचा १३ धावांनी पराभव केला.
सोलापूर स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मास्टर क्रिकेट क्लबने ३५ षटकात सर्वबाद १४९ धावा केल्या. त्यायामध्ये विघ्नेश गवळीने ३७ धावा, ढाईंगडे याने २० धावा व ओम धोत्रे याने २८ धावा केल्या.
सोलापूर स्पोर्ट्स संघाकडून अश्वतचंद्र तोरा याने २० धावांत चार बळी, निखिलेश महाकाल याने ४४ धावांत दोन बळी व ओम साई अंबट याने ९ धावांत दोन बळी घेतले.
मास्टर्स क्रिकेट क्लब १४९ धावांचा पाठलाग करताना सोलापूर स्पोर्ट्सचा सर्व संघ ३५ षटकात १३६ धावांत सर्वबाद झाला. त्यामध्ये अश्वतचंद्र तोरा याने ४६ धावा, लटमन २० धावा व शुभम याने १३ धावा केल्या. मास्टर क्रिकेट क्लबकडून बनसोडे याने २० धावांत दोन बळी, प्रणव कट्टे याने २६ धावांत दोन बळी व प्रशांत जाधव याने २१ धावांत दोन बळी घेतले. सामनावीर पुरस्कार विघ्नेश गवळी याला देण्यात आला. ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शनने पुरस्कृत केली आहे.