सोलापूर जिल्हा खो-खो पंच परीक्षेत विजयकुमार बबलेश्वर प्रथम

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर जिल्हा खो-खो पंच परीक्षेत सोरेगावचे विजयकुमार मुत्येप्पा बबलेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शहानवाज इब्राहिम मुजावर (सांगोला) व राजू शंकर राठोड (मंद्रूप) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले.

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि समृद्धी स्पोर्ट्स क्लब व सोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा एसआरपी कँपच्या सहकार्याने ही परीक्षा आयोजित केली होती. पंच परीक्षेपूर्वी असोसिएशनचे सरचिटणीस ए बी संगवे, सहसचिव मोहन रजपूत, राष्ट्रीय पंच शरद व्हनकडे, श्रीरंग बनसोडे, नागेश माडीकर, पंच मंडळ सचिव गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, पंच मंडळ सदस्य अजित शिंदे, पुंडलिक कलखांबकर, शिवशंकर राठोड यांनी मार्गदर्शन केले.

कुमठ्याचे केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे यांनी या परीक्षेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. उपस्थितांचे स्वागत बाळासाहेब खटाळ व श्रीशैल समदुर्ले यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर यांनी सूंत्रसंचालन केले.

उत्तीर्ण परीक्षार्थी

संदीप चंद्रकांत ढोंगे, अमोल श्रीशैल केदार, शुभम मोहन पवार, किशोर शिवशंकर बगले, प्रशांत यशवंत पुजारी, संजय शंकर राठोड, राजू शंकर राठोड, अनिल विठ्ठल राठोड, प्रेमदास रामू राठोड, अरुण वसंतराव पांचाळ, राजशेखर स्वामीनाथ करपे, अलोक तेजस मांडवे, प्रणव दिलीप अडसूळ, समीर अन्वर शेख, श्रीनाथ खंडू खटके, युवराज रामचंद्र शेंडगे, संदीप शिवानंद आनंदपूर, सुनील रेवप्पा पुजारी, विजय शाहूराज अडगळे, दादासाहेब मारुती बरडे, जगन्नाथ आदीनाथ जाधव, गोरख वसंत ढेरे, सूरज हणमंत शेवाळे, धनंजय पोपट बुधावले, अनिकेत सुभाष सावंत, अविनाश अंबादास हरभरे, अजय हरिश्चंद्र कश्यप, संतोष शत्रुघ्न शेळके, श्रीशैल पांडुरंग समदुर्ले, सोनाली जयवंत भोसले, रेखा अनिलकुमार आरनेकरी, प्रकाश रामचंद्र गायकवाड, अंकुश दिलीप थोरात, अविनाश सिद्धाराम कोळी, भाऊसाहेब शामराव गायकवाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *