राज्य तलवारबाजी स्पर्धेत आरव, क्रांती, अवियांक, अरेनाला सुवर्णपदक 

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मिनी आणि सहावी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आरव भोसले (सोलापूर), क्रांती जाकवाड (लातूर), अवियांक शेट्टी [(मुंबई उपनगर), अरेना सिन्हा (पुणे) या खेळाडूंनी सुवर्णपदक संपादन केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर मगरे, तुकाराम मेहत्रा,अजय त्रिभुवन, तुषार आहेर, विजय गाडेकर, पिराजी कुसळे, राहुल दणके, शिल्पा नेने, जयदीप पांढरे, विश्वजित कुलकर्णी, गौरव गोटे, महेश कोरडे, विशाल दानवे, अमृता भाटी आदी प्रयत्नशील आहेत

महत्त्वाचे निकाल

१२ वर्षांखालील इप्पी मुले ः १. आरव भोसले (सोलापूर), २. जत वानकर (सोलापूर), ३. सोहम मुंडे (बीड), ४. हर्षल खामत (छत्रपती संभाजीनगर).

१२ वर्षांखालील ईप्पी मुली ः १. क्रांती जाकवाड (लातूर), २. मोहिनी फेगडे (छत्रपती संभाजीनगर), ३. पूर्वा म्हात्रे (रायगड), ४. अभया कांबळे (लातूर).

१० वर्षांखालील फॉइल मुले ः १. अवियांक शेट्टी (मुंबई उपनगर), २. शौर्य चिंचोळे (छत्रपति संभाजीनगर), ३. कबीर देव (पुणे), ४. आरुष पुपळे (छत्रपती संभाजीनगर).

१० वर्षांखालील फॉइल मुली ः  १. अरेना सिन्हा (पुणे), २. काव्या धनगर (अहमदनगर), ३. निधी देशमुख (अहमदनगर), ४. वैदेही बनकर (नागपूर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *