पहिले टी २० शतक ठोकताना स्मृती मानधनाने मोडला हरमनप्रीतचा विक्रम 

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

नॉटिंगहॅम ः स्मृती मानधनाने इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या टी २० सामन्यात भारतीय महिला संघासाठी शानदार आणि धमाकेदार शतक ठोकून अफलातून कामगिरी केली. तिच्यामुळेच भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड महिला संघ फक्त ११३ धावांवर बाद झाला. अशाप्रकारे भारताचा विजय ९७ धावांनी झाला. मानधनाने चांगल्या फलंदाजीने सामन्यात अनेक विक्रम केले.

स्मृती मानधनाने सामन्यात ६२ चेंडूत ११५ धावा केल्या, ज्यामध्ये १५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिचे पहिले शतक होते. तिने वादळी खेळी खेळताच, ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारी भारतीय फलंदाज बनली आहे. तिने हरमनप्रीत कौर हिचा विक्रम मोडला आहे. २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध महिला टी२० क्रिकेटमध्ये हरमनप्रीतने १०३ धावांची खेळी केली. आता मानधनाने भारतासाठी महिला टी २० मध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत पहिले स्थान पटकावले आहे आणि सर्व भारतीय खेळाडूंना मागे टाकले आहे.

टी २० सामन्यात चौकारांवरून सर्वाधिक धावा

स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात १५ चौकार आणि तीन षटकार मारले. यासह, ती टी २० क्रिकेट सामन्यात चौकारांवरून सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. तिने सामन्यात चौकारांवरून एकूण ७८ धावा केल्या आहेत.

महिला टी २० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या भारतीय खेळाडू

स्मृती मानधना – ११२ धावा

हरमनप्रीत कौर – १०३ धावा

मिताली राज – ९७ धावा

स्मृती मानधना – ८७ धावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *