
जुन्नर ः पुणे येथे आयोजित सीएटीसी ७०९ कॅम्पमध्ये जुन्नर येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट यांनी उत्कृष्ट संचालनात द्वितीय क्रमांक मिळवला.
एनसीसी हेडक्वार्टर पुणे येथे एनसीसी १ महाराष्ट्र सिंगनल कंपनी यांचा सीएटीसी ७०९ कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे २३ कॅडेट सहभागी झाले होते. सर्व कॅडेट्सनी उत्कृष्ट संचलन करुन द्वितीय क्रमांक संपादन केला. तसेच या कॅम्पमध्ये शुटिंग स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत चैतन्य पवार याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच वेद जगताप याने उत्कृष्ट कॅडेट म्हणून पारितोषिक संपादन केले. या यशाबद्दल शाळेतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.