विनर्स अकादमीचा सहारा संघावर मोठा विजय

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 184 Views
Spread the love

प्रेम बोर्डेची नाबाद ९८ धावांची दमदार खेळी, पुष्कर जोशीचे २९ धावांत पाच बळी

छत्रपती संभाजीनगर ः पीईएस कॉलेज मैदानावर झालेल्या २५ षटकांच्या सामन्यात विनर्स क्रिकेट अकादमी संघाने सहारा क्रिकेट अकादमीवर ७४ धावांनी विजय नोंदवला. या लढतीत पुष्कर जोशी हा सामनावीर ठरला. 

पीईएस कॉलेज मैदानावर हा सामना झाला. या लढतीत विनर्स क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारात २५ षटकात तीन बाद २३० अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना सहारा क्रिकेट अकादमीचा संघ २५ षटकात आठ बाद १५६ धावा काढू शकला. विनर्स अकादमीने ७४ धावांनी सामना जिंकला. 

या सामन्यात प्रेम बोर्डे याने स्फोटक फलंदाजी करत ७७ चेंडूत नाबाद ९८ धावा फटकावल्या. प्रेमचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याने तीन टोलेजंग षटकार व आठ चौकार मारले. सुबोध झाल्टे याने ४९ चेंडूत ५४ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने सहा चौकार मारले. अनिश ठोकळ याने २३ चेंडूत ४३ धावांची आक्रमक खेळी करताना सात चौकार मारले. गोलंदाजीत पुष्कर जोशी याने प्रभावी मारा करत २९ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. अमान सिद्दिकी याने २२ धावांत दोन गडी बाद केले. सारंग सोनवणे याने २३ धावांत एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक 
विनर्स क्रिकेट अकादमी – २५ षटकात तीन बाद २३० (प्रेम बोर्डे नाबाद ९८, स्वतेज जक्कल २०, चिन्मय दिवाण ११, अनिश ठोकळ ४३, पवन राठोड नाबाद १६, इतर ४२, अमान सिद्दिकी २-२२, हर्षल बोरुबे १-२९) विजयी विरुद्ध सहारा क्रिकेट अकादमी – २५ षटकात आठ बाद १५६ (अफान १९, सुबोध झाल्टे ५४, सार्थक शुक्ला ७, गणेश वरकड ६, तनवीर पठाण २६, शेख अबुबकर १६, अमान सिद्दिकी ८, पुष्कर जोशी ५-२९, क्रिश १-२३, सारंग सोनवणे १-२३, राहुल १-५). सामनावीर – पुष्कर जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *