शांभवी चषक स्पर्धेत नागेश साळुंखे अकादमीचा मोठा विजय

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलांच्या जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत नागेश साळुंखे क्रिकेट क्लब पंढरपूर संघाने आर एन क्रिकेट क्लब पंढरपूर संघाचा ६८ धावांनी पराभव केला.

ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन यांनी पुरस्कृत केली आहे. नाणेफेक जिंकून नागेश साळुंखे क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना ३६ षटकात सर्वबाद १४६ धावा केल्या. यामध्ये वीर गायकवाड २४ धावा, यशराज लटके २३ धावा व संस्कार फाटे याने २१ धावा केल्या. आर एन क्रिकेट क्लबकडून समर्थ रांगे याने १६ धावांत तीन बळी, वीर कोळेकरने १९ धावांत दोन बळी व समर्थ ठोंबरे याने १७ धावांत दोन बळी घेतले.

आर एन क्रिकेट क्लबकडून वीर कोळेकरने २० धावा, समर्थ ठोंबरेने १४ धावा व रुद्र चौगुले याने १३ धावा केल्या. नागेश क्रिकेट क्लबकडून अविनाश गरड याने १० धावांत दोन बळी, यशराज लटके याने तीन धावांत दोन बळी व कार्तिक पाटोळे याने २४ धावांत दोन बळी घेतले. सामनावीर पुरस्कार अविनाश गरड याला देण्यात आला.

आता ३० जून रोजी किशोर बोरामणी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध एस एस एस क्रीडा भारती क्रिकेट अकॅडमी यांच्या दरम्यान भंडारी मैदान येथे सामना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *