
१४ वर्षांखालील गटात सार्थक उंबरे अजिंक्य
सोलापूर ः डॉ व्ही एम मेडिकल कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात स्वप्नील हदगल आणि १४ वर्षांखालील गटात सार्थक उंबरे यांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे संयोजन श्री रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने तर सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने संपन्न झाले. सुंदर मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ बालरोग तज्ञ डॉ सुनील घाटे यांच्या हस्ते झाला. यावेळी पतसंस्थेचे सचिव रमाकांत फुटाणे, संस्थापक अध्यक्ष डी टी जोशी, उपाध्यक्ष डी जे बंडगर, आकाश तळमोहिते, सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन सचिव शरद नाईक, सुशील कुमार शिंदे भा. वी. प्रशालेचे अध्यक्ष संतोष पैकेकरी, जिल्हा न्यायालय लिपिक हेमराज जमादार, बुद्धिबळ पंच सचिन चव्हाण, ईश्वर जांभळे, वाय आर पांढरे, बसवराज औरसंग, मधुकर बोलबत्तीन आदी उपस्थित होते.
अंतिम निकाल
खुला गट ः १. स्वप्नील हदगल, २. प्रसन्न जगदाळे, ३. अमित मुदुगुंडी, ४. विशाल पटवर्धन, ५. सागर गांधी, ६. अमोल तोडकरी, ७. चंद्रशेखर बसर्गिकर, ८. नंदकुमार सुरू, ९. चंद्रकांत पवार, १०. रमेश नायर.
१९ वर्षाखालील ः १. संकेत पाटील, २. ओम गायकवाड, ३. गणेश घोरपडे, ४. समर्थ घोडके, ५. प्रांजली वाघमारे, ६. विशाखा दहिभाते, ७. वेदांत देशपांडे, ८. सुप्रीत घनाते, ९. गौरव सिंग दाळवाले, १०. फैयाज शेख.
१७ वर्षांखालील ः १. सानवी गोरे, २. सानिध्य जमादार, ३. श्रेया संदूपटला, ४. सागर पवार, ५. अर्णव बिदादा, ६. ओंकार बनसोडे, ७. प्रतीक वल्लकाटी, ८. हर्ष देशपांडे, ९. श्रावणी देवनपल्ली, १०. प्रतीक नामदे.
१४ वर्षांखालील ः १. सार्थक उंबरे, २. साईराज घोडके, ३. अमेय शिवपुजे, ४. वेदांत
मुसळे, ५. मयुरेश स्वामी, ६. राघव भांदर्गे, ७. सुकन्या बिराजदार, ८. वेद आगरकर, ९. हर्ष हलमल्ली, १०. प्रतीक झांजणे.
११ वर्षांखालील ः १. ओम निरंजन, २. प्रतीक्षा चाबुकस्वार, ३. अंश गायकवाड,
४. समरजीत देशमुख, ५. स्वप्नजीत शितोळे, ६. विवान दासरी, ७. रामकृष्ण बडवणे, ८. गीतांजली जाधव, ९. गोवर्धनी मीठ्ठा, १०. अर्णव जोशी.
१० वर्षांखालील ः १. विहान कोंगारी, २. सृष्टी मुसळे, ३. श्लोक चौधरी, ४. शौर्य सीताप, ५. श्रेयस इंगळे, ६. विवान अरकाल, ७. शशांक जमादार, ८. श्रेयस कंदीकटला, ९. राजवर्धन पराडे, १०. हर्षिता भोसले.
९ वर्षांखालील ः १. पृथा ठोंबरे, २. नैतिक होटकर, ३. उत्कर्ष पांचाळ, ४. उत्कर्षा लोखंडे, ५. प्रथम मुदगी, ६. हर्ष मुसळे, ७. स्वामी मयूरेश, ८. अथर्व दणाने, ९. हिमांशू व्हनगावडे, १०. शिवराज जाधव.
८ वर्षांखालील ः १. राजवर्धन देशमुख, २. प्रज्ञेश काबरा, ३. श्रेया पैकेकरी, ४. आर्यन गांधी, ५. नमन रंगरेज, ६. भुवनेश्वर जाधव, ७. नियांन कंदिकटला, ८. सिद्धार्थ शेळके, ९. पमनानी ऋषभ, १०. आयुष्य लामकाने.
उत्तेजनार्थ ः अद्विक ठोंबरे, अदिती चंदनशिवे, शंभूराजे सावंत, समिधा चंदनशिवे, आरोही दलाल, रुही दलाल, सृष्टी चंदनशिवे, अविष्कार दलाल, अबीर पटवर्धन, यशोदा बिराजदार.