तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक संघास विजेतेपद

  • By admin
  • June 30, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः  छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी मिनी व सहावी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दहा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले. सोलापूर संघाने दहा वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद त्याचप्रमाणे बारा वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद संपादन केले. याचबरोबर बारा वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिक जिल्ह्याने विजेतेपद संपादन केले.

साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात राज्य तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार विक्रम काळे व भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे, सिनेट सदस्य बंडू सोमवंशी, अशोक दुधारे, प्रकाश काठोळे, अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष अशोक कदम,  जिल्हा संघटनेचे एस पी जवळकर, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती. 
तसेच स्पर्धेदरम्यान जालना जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी संजय गाढवे, विजय वानखेडे व विष्णू नीळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुकाराम मेहत्र, अजय त्रिभुवन, सागर मगरे, शिल्पा नेने, तुषार आहेर, विजय गाडेकर, पिराजी कुसळे, सुशील अंभोरे, राहुल दणके, जयदीप पांढरे, गौरव गोटे, अमृता भाटी, विशाल दानवे आदी परिश्रम घेतले.

अंतिम निकाल

बारा वर्षाखालील फाईल मुले ः १. कवीश उत्तेकर (पुणे), २. सूर्य यादव (नाशिक), ३. सक्षम जाधव (पुणे), ४. चिरायू पाटील (नाशिक).

बारा वर्षाखालील फाईल मुली ः १. रायना रवेशिया (मुंबई उपनगर), २. अनन्या सुळे (नाशिक), ३. आराध्या कुंभार (नाशिक), ४. मोक्षिता केसरकर (नाशिक).

दहा वर्षाखालील सेबर मुले ः १. रुद्र आहेवाढ (छत्रपती संभाजीनगर), २. शिव निळ (छत्रपती संभाजीनगर), ३. श्रीराज पोळ (सातारा), ४. निळ सुरावसे (सोलापूर).

दहा वर्षाखालील सेबर मुली ः १. साईलीला पुलगाम (सोलापूर), २. अन्विता तजणे (नाशिक), ३. अनघा घोरपडे (छत्रपपती संभाजीनगर), ४. राव्या सोनटक्के (अमरावती). 

बारा वर्षाखालील सेबर मुली ः १. शरण्या डेरले (नाशिक), २. अर्शिया शेट्टी (रायगड), ३. दिव्यांशी धरपुरा (नागपूर), ४. तेजस्विनी साखरे (सोलापूर). 

बारा वर्षाखालील सेबर ः १. प्रज्वल सातरे (अहिल्यानगर), २. शिरीष शातगर (सोलापूर), ३. ओजस वाघ (हिंगोली), ४. रुद्र अहवाल (छत्रपती संभाजीनगर). 

सर्वसाधारण विजेतेपद 

दहा वर्षाखालील मुले ः प्रथम : छत्रपती संभाजीनगर,  द्वितीय : मुंबई उपनगर, तृतीय : रायगड.

दहा वर्षाखालील मुली ः प्रथम : सोलापूर,  द्वितीय : पुणे, तृतीय : लातूर.

बारा वर्षाखालील मुले ः  प्रथम : सोलापूर, द्वितीय ः पुणे, तृतीय : अहिल्यानगर.

बारा वर्षाखालील मुली ः  प्रथम : नाशिक,  द्वितीय : लातूर, तृतीय : मुंबई उपनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *