
ठाणे ः चेंबूर बीएमसी स्कूल येथे झालेल्या थाई बॉक्सिंग स्पर्धेत माथेरान व्हॅली स्कूलच्या मुलांची धडकदार कामगिरी करत अकरा सुवर्ण पदक, चार रौप्य पदक तर आठ कांस्य पदकांची कमा करत नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत आपले नाव कायम ठेवले.
तसेच रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरवण्याचा सन्मान मिळवून दिला. या स्पर्धेत मुंबईसह पाच जिल्हे सहभागी होते. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मुंबई विभाग अध्यक्ष हरी ओम, उपाध्यक्ष अजय सरोदे आणि सर्व पदाधिकारी हजर होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल व सर्व शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी खेळाडूंना स्वप्नील अडूरकर व करण बाबरे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक ः दिशा शेळके, मयुरी देवळे, अजित सुपे, गार्गी खोकले, वेदा गवळी, निसर्गा गवळी, खुशबू द्विवेदी, मोक्षित डबेकर, वेदिका पेरणे, काव्या पेरणे.
रौप्यपदक ः कार्तिक मेत्रे, गायत्री डामसे, सुशांत कानात.
कांस्य पदक ः जय डामसे, वैदेही जाधव, दिशांत भोईर, आयुष अस्वले.