तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांदोपटूंचे घवघवीत यश

  • By admin
  • July 1, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक रंजना मोडूळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या सर्व यशस्वी गणराज तायक्वांदो खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, गणराज क्लबच्या पदाधिकारी, अध्यक्ष वकील, पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, शलाका जावकर, टेक्निकल प्रमुख परेश मोडूळा, सीनियर खेळाडू डॉ मयुरेश नडगिरी, आदिती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, साहिल शिवगण, स्वानंद तुपे, अखिलेश वांयगणकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी बेल्ट धारक खेळाडू

येलो बेल्ट ः विधी विवेककुमार दुबे, अहद नवीद वस्ता.

ग्रीन बेल्ट ः निरज प्रशांत मकवाना, आहाना आशिष रसाळ, आध्या आशिष रसाळ.

ब्ल्यु बेल्ट ः जैनब वसिम काझी, तीर्था प्रशांत मकवानाय

रेड ः अनया अभिज्ञ वणजू, समर्थ सुशांत विचारे, अथर्व आत्माराम मुरकुटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *