
पुणे ः ‘काय लवचिकता आहे या मुलाच्या शरीरात’, ‘किती छान करतोय ही रचना’ असे उद्गार प्रेक्षकांनी व्यक्त केले. निमित्त होते हरितास चॅरिटेबल ट्रस्ट आणि माइंड अँड बॉडी योगा इंस्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने राधाबाई टोळ सभागृह येथे आयोजित केलेल्या योगासन स्पर्धांचे. नर्सरी मधील मुलांमुलींनी चित्तवेधक योगासने करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत नर्सरी ते बारावीपर्यंतच्या तीनशेहून अधिक मुला-मुलींनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन हरितास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ॲड आमोद देव आणि सी एस आर नेक्ससचे सहसंस्थापक निखिल गद्रे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षिस समारंभ मेजर मैत्रेयी दांडेकर आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉ. मिलिंद ढमढेरे यांच्या हस्ते झाला. माईंड ॲंड बॉडी योगा इंस्टिट्यूटच्या डॉ मनाली देव यांनी या स्पर्धेला तांत्रिक मार्गदर्शन केले.
गटवार निकाल
नर्सरी टू सिनियर केजी ग्रुप- मुली – १)अद्विका इंदलकर, २) इनाया कर्वे, ३) श्रीशा तिळवणकर. मुले – १) मेघराज महाजन, २) ध्रुव जोशी, ३) यशवर्धन शिंदे.
पहिली व दुसरी गट – मुली – १) निहिरा गोखले, २) ध्रुवी सोनवणे, ३) रमा काणे व रमा बेहरे. मुले – १) अक्षय मेवाडा, २) मेघराज जगताप, ३) प्रशांत मुळे.
तिसरी व चौथी-मुली – १) ओवी माझिरे, २) मिहीरा कर्वे, ३) कस्तुरी जोशी. मुले – १) देवांश जोशी, २) अद्वैत बापट, ३) गुरुराज शिंदे.
पाचवी व सहावी मुली – १) आदिती माने, २) दुर्वा जगदाळे, ३) अन्वी पाटील व अस्मि कुलकर्णी. मुले – १) शिवराज काळे, २) सदानंद कोरडे, ३) कौशल खासनीस.
सातवी व आठवी मुली – १) अर्णवी नाईक, २) मुक्ता शुक्ल, ३) कश्वी गायकवाड. मुले – १) आरुष कवळेकर, २) वरद पारनेर, ३) तुषार दराडे.
नववी व दहावी मुली – १) शरण्या देवकर, २) केया गुरसाळे, ३) तस्मयी अरगडे. मुले – १) रेवनसिद्ध कोरे, २) सर्वेश देशपांडे, ३) कार्तिक मिरकड.
अकरावी व बारावी मुली – १) विस्मया भागवत, २) मीरा अभ्यंकर, ३) अनुश्री जोशी.
मुले : १) समर्थ खोले.