
सांघिक विजेतेपदासह पुरुष व महिला गटात महाराष्ट्र चॅम्पियन
मुंबई ः राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राची अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. महाराष्ट्र संघाने २६० गुणांची कमाई करत सांघिक विजेतेपद पटकावले. तसेच पुरुष व महिला गटात दबदबा कायम ठेवत महाराष्ट्र संघ अव्वल ठरला आहे.
दावणगिरी (कर्नाटक) या ठिकाणी राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राने २६० गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. तसेच सीनियर गटात पुरुष संघ ४७ व महिला संघ ४४ गुणांसह गटात विजेता राहिला. सब ज्युनियर व ज्युनियर संघाने ४४ गुणांसह सांघिक उपविजेतेपद संपादन केले.
या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान संजीवन भास्करन, संजय सरदेसाई, सूर्यकांत गर्दे, अनंत चाळके, राजहंस मेंदळे व रक्षा महाराव यांचे मार्गदर्शन लाभले.
पदक विजेते खेळाडूंची नावे
सीनियर गट ः निलेश गराटे (सुवर्णपदक), गणेश तोटे (कांस्यपदक), संकेत चव्हाण (रौप्यपदक), सागर मिराशी (सुवर्णपदक).
सब-ज्युनिअर मुले ः आदित्य मिस्त्री (सुवर्णपदक), मयूर कोनकर (सुवर्णपदक), ईशान सिंग (सुवर्णपदक).
ज्युनिअर मुले ः १. विराज पावसकर (सुवर्णपदक), चैतन्य पंदेकर (रौप्य पदक), जस्वीरसिंग भाटिया (रौप्य पदक).
सीनियर महिला गट ः काजल भाकरे (रौप्य पदक), सुश्मिता देशमुख (रौप्य पदक), समृद्धी देवळेकर (सुवर्णपदक), प्रेरणा साळवी (सुवर्णपदक), निवेदिता खारकर (रौप्य पदक), आश्लेषा गुडेकर (रौप्य पदक).
सब-ज्युनिअर मुली ः अचलकुमारी राजभर (रौप्य पदक), सेजल बेलवलकर (रौप्य पदक), तपस्या मते (रौप्य पदक), सई शिंदे (रौप्य पदक), अनुराधा राठोड (सुवर्णपदक),
ज्युनियर मुली ः सेजल मोईकर (रौप्य पदक), मृणाली भोग (पुणे).