मुंबई मनपा शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा 

  • By admin
  • July 2, 2025
  • 0
  • 183 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई मनपा शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत वरिष्ठ पर्यवेक्षक दत्तू लवटे यांच्यासोबत चर्चा संपन्न झाली. त्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. 

शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ पर्यवेक्षक (प्र) दत्तू लवटे यांच्या समवेत शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शारीरिक शिक्षण शिक्षक भरती जागा प्रस्ताव, कनिष्ठ पर्यवेक्षक सरळ सेवेने भरती प्रस्ताव, नवीन आलेले क्रीडा साहित्यासाठी उदाहरणार्थ, टेबल टेनिस ,बॉक्सिंग आदी खेळांसाठी कोचेस नेमणे, स्पोर्ट सेंटर भूमिका, किती तासिका, शासकीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करून त्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देणे, अॅथलेटिक्स, सांघिक क्रीडा स्पर्धेत डॉजबॉल या खेळाचा समावेश, विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, स्पर्धा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी प्रमाणपत्राचे वितरण, आरएसपी स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरणासाठी प्रत्येक विभागात व्हिक्टरी स्टॅन्ड, वेळापत्रक तासिका बद्दल लवचिकता, उन्हाळी सुट्टीत असणारे जलतरणाचे प्रशिक्षण यासाठी मार्च-एप्रिलमध्ये पूर्व तयारी करणे अशा विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. 

तसेच शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र मार्फत इच्छुक शारीरिक शिक्षण शिक्षणासाठी ट्रंपेटचे/सेकसोफोनचे प्रशिक्षण देणे, अमरावती, पुणे बालेवाडी येथील क्रीडा संस्थांना शैक्षणिक भेट देणे, पदवीधर वेतनश्रेणी बाबत, गिल्डर टॅंक ग्रँड रोड येथील शारीरिक शिक्षण विभागाचे कार्यालय सुशोभीत करून घेण्याबाबत अशा विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली. सदर प्रश्नाबाबत सविस्तर माहिती लवटे यांनी दिली.  शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरती बाबतची माहिती प्रशासनाला दिलेली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच सरळसेवेने कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक यांचा प्रस्ताव दिलेला आहे याची कॉपी त्यांनी आम्हाला दाखवली. पूर्वीच्या वार्डनुसार विभागाची रचना याबाबतीत सविस्तर चर्चा करून माहिती घेऊन विचार करू असे सांगितले.

क्रीडा कोचचा विषय डी मार्ट बरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. शासकीय स्पर्धेत ॲथलेटिक्स मधील विद्यार्थ्यांच्या पाच दिवसांच्या शिबिरास सकारात्मक दर्शवली. सांघिक खेळामध्ये डॉजबॉल व विभागीय क्रिकेट स्पर्धेस मान्यता दिली. तसेच अन्य विषयांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. 

स्पोर्ट्स सेंटर बाबत ३६ तासिका घेऊन नंतर स्पोर्ट्स सेंटर घेणे, अमरावती, बालेवाडी या क्रीडा संस्थांना भेटी देण्याचा चांगला विचार आहे जरूर विचार करू असे सांगितले. क्रीडा साहित्य खरेदी मधून प्रत्येक विभागात व्हिक्टरी स्टँड घेऊ असे मान्य केले. पदवीधर वेतनश्रेणी बाबतची योग्य प्रस्ताव आपली बाजू वेळोवेळी आपण मांडू असे आश्वासन दिले.

या चर्चे दरम्यान शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटचे पदाधिकारी डॉ जितेंद्र लिंबकर, अनिल सनेर, संदीप येदे, ललित पाटील, प्रशांत देऊळकर चंद्रकांत घोडेराव हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *