
छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र राज्यस्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने १० सुवर्ण, ६ रौप्य व १८ कांस्यपदके पटकावत स्पर्धा गाजवली.
पुणे येथे २६ ते २९ जून दरम्यान किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित ऑल महाराष्ट्र राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने शानदार कामगिरी बजावत ३४ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ६ रौप्य व १८ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदक विजेत्या खेळाडूंची २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
विजयी खेळाडूंना प्रशिक्षक, सुरेश मिरकर, अनिल मिरकर, सुमित जाधव, सागर रासकर, सृष्टी अकोलकर, प्रफुल दांडगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या स्पर्धेत आरव मिरकर, आदित्य यादव, गौरव रासकर, विराज भालेकर, राजवर्धन थोरात, सृष्टी अकोलकर, प्रांजली ढाकणे, अंशुमन मिरकर, दिशा सोनार, केतकी अंगडी, परिणीती लाटे, स्वरा हराळ, धनश्री वाघमोडे, आचल यादव, सर्वेश लाडे, कृष्ण जंगले, चैतन्य इंगळे, समृद्धी भागुरे, धीरज डागर, छोटू राम यांनी चमकदार कामगिरी बजावत पदकांची कमाई केली.
विजयी खेळाडूंचे इंडियन आर्मीचे लेफ्टनंट कर्नल सुजित कुमार, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, सोनामाता शाळेच्या संचालक विमलताई तळेगावकर, राका लाइफस्टाइल क्लबचे संचालक सुनील राका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव अनिल मिरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.