
एजबॅस्टन ः बर्मिंगहॅम मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. आठपैकी सात कसोटी सामने भारतीय संघाने या मैदानावर गमावले आहेत. तरीही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्याबरोबर कुलदीप यादव याला संघाबाहेर ठेवण्याचा धाडसी निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. बुमराह-कुलदीप यांना बाहेर ठेवून भारतीय संघ २० विकेट कशा मिळवणार याविषयी सोशल मीडियावर चर्चा होत असून संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर टीका होत आहे.
भारताच्या संघाकडून कॅप्टन शुभमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंच्या जागी आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी मिळाली आहे. या सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळेल असे मानले जात होते, परंतु कर्णधार गिलने सुंदरवर विश्वास व्यक्त केला आहे. कारण तो खाली क्रमाने येऊन काही धावा करू शकतो. तर कुलदीप यादवची फलंदाजी कमकुवत आहे. गोलंदाजीत कुलदीप त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. कुलदीपने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत. तर सुंदरच्या नावावर २५ टेस्ट विकेट्स आहेत.
वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीमुळे संधी मिळाली
भारतीय संघाचा कर्णधार जो कोणी असला तरी त्याला नेहमीच असा खेळाडू हवा असतो जो फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करू शकेल. जेणेकरून तो खालच्या क्रमात उतरू शकेल आणि गरज पडल्यास काही धावा काढू शकेल. कदाचित यामुळेच कुलदीप यादवला अंतिम अकरा संघात संधी मिळाली नाही आणि वॉशिंग्टन सुंदरचे नशीब खुलले आहे. कुलदीपने कसोटी सामन्यांमध्ये १९९ धावा केल्या आहेत आणि सुंदरने ४६८ धावा केल्या आहेत.
कर्णधार शुभमन गिलने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, संघात तीन बदल आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आम्हाला चांगला ब्रेक मिळाला आहे. हा एक महत्त्वाचा सामना आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यामुळे आम्हाला वाटते. त्या खेळपट्टीवर बरेच काही असेल, जिथे आम्ही त्यांचा वापर करू शकू. आम्हाला कुलदीप यादवला खेळवायचे होते. पण शेवटच्या सामन्यात खालच्या क्रमात आमची कामगिरी पाहता, आम्ही फलंदाजी लाइन-अप मजबूत करण्याचा निर्णय घेतला.