
नवी दिल्ली ः भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने बुधवारी कॅनडा ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत तीन गेमच्या रोमांचक सामन्यात आपल्याच देशाच्या प्रियांशु राजावतचा पराभव करून पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, परंतु तरुण आयुष शेट्टी पराभवानंतर बाहेर पडला.
वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२१ चा रौप्यपदक विजेता श्रीकांतने पहिल्या फेरीच्या सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करत राजावतचा १८-२१, २१-१९, २१-१४ असा ५३ मिनिटांत पराभव केला. मे महिन्यात मलेशिया मास्टर्स स्पर्धेत श्रीकांत उपविजेता होता. दुसऱ्या सामन्यात शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमने शेट्टीचा २३-२१, २१-१२ असा पराभव केला.