
मुंबई : कोलकता येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल रोड स्केटिंग स्पर्धेत मुंबईकर अवघ्या सात वर्षांच्या जेष्ठा शशांक पवारने तीन सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण पदक जिंकण्याची हॅटट्रिक साजरी केली.
सहा ते आठ वयोगटात सहभागी झालेल्या जेष्ठा पवार हिने स्पर्धेत सर्वात वेगवान आणि लहान स्केटचा देखील मान मिळवला. असा पराक्रम करणारी ती पहिली मुंबईची स्केट ठरली. आयईएस ओरियन शाळा, दादर येथे ती शिकत आहे. मेहमुद सिद्दीकी, राजसिंग, अजय शिवलाणी यांचे प्रशिक्षण तिला मिळत आहे. या अगोदर थायलंड येथील स्पर्धेत देखील तिने सुवर्ण पदक मिळवले होते. आतापर्यंत विविध स्पर्धात जेष्ठाने चाळीसपेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. स्केटिंगचा श्री गणेशा करुन जेष्ठाला दोन वर्ष झाली.