छत्रपती संभाजीनगर ः आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठल चषक राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य संयोजक भिकन अंबे यांनी दिली.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना संयोजक भिकन अंबे म्हणाले की, विठ्ठल चषक राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धा ६ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ९ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रशिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्वांसाठी संस्थेच्यावतीने जेवणाची व्यवस्था केली आहे असे संयोजक भिकन अंबे यांनी सांगितले.