
पुणे ः एन्ड्युरन्स नेपाळ फेडरेशनने नेपाळमधील एन्ड्युरन्स प्रशिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसांचे कोचिंग आणि ऑफिशिएटिंग प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.
कोशी नेपाळ येथे झालेल्या या कार्यक्रमात २० प्रशिक्षक सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी प्रशिक्षकांना एन्ड्युरन्स वर्ल्ड स्पोर्ट्सच्या नियमानुसार तपशीलवार प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या दिवशी खेळाबद्दल प्रॅक्टीकल ज्ञानासाठी स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमात २० सेकंद, २ मिनिटे, ५ मिनिटे एलिमिनेशन आणि १५ मिनिटे एलिमिनेशन रेसचे प्रशिक्षण घेतले गेले. कार्यक्रमाच्या शेवटी फेडरेशनने लेव्हल ३ ऑनलाइन परीक्षा घेतली. ९० टक्के प्रशिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना येत्या एंड्युरन्स नेपाळ राष्ट्रीय स्पर्धेत लेव्हल ३ प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली.एंड्युरन्स वर्ल्ड स्पोर्ट्सचे अध्यक्ष योगेश कोरे यांना एंड्युरन्स नेपाळ फेडरेशनने आमंत्रित केले होते. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.