
भारतीय संघात पहिल्यांदा निवड
नाशिक ः के के वाघ महाविद्यालयात शिकत असलेल्या श्रावणी सांबरेकर हिची आंतरराष्ट्रीय एशियन नेटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
नाशिकची खेळाडू श्रावणी संतोष सांबरेकर ही नेटबॉल खेळातील सुरुवातीपासून अष्टपैलू खेळाडू आहे. तिने वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेत व राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा गौरव वाढवला आहे. श्रावणीला शालेय जीवनापासून स्वप्निल करपे यांनी नेटबॉल खेळासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे. आजही योगायोगाने तिच्या वाघ महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून स्वप्नील करपे हे कार्यरत आहेत. श्रावणीची ओळख भारतात बऱ्याच दिवसांपासून अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे.
नाशिक जिल्ह्यातून नेटबॉल या खेळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली श्रावणी सांबरेकर ही पहिली खेळाडू आहे. श्रावणी सांबरेकर हिची निवड वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा तसेच यावर्षी जयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी शिबिरातून तिची निवड भारतीय संघात करण्यात आलेली आहे. प्रथमता हरियाणा व त्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या निवड चाचणी शिबिरामधून आंतरराष्ट्रीय एशियन युथ नेटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.
श्रावणी सांबरेकरच्या यशाबद्दल नाशिक जिल्हा नेटबॉल अध्यक्ष संजय पाटील, सचिव स्वप्नील करपे तसेच श्रावणीच्या शालेय जीवनातील क्रीडा शिक्षिका सुरेखा पाटील, के के वाघ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव बंदी, स्मॉइल व स्पिन्याच संस्थेचे अजिंक्य वाघ, सरस्वती नगर कॅम्पसचे समन्वयक डॉक्टर शेवलीकर, प्राचार्य डॉ संभाजी पाटील, उपप्राचार्य डॉ अनुराधा नांदुरकर, विज्ञान शाखा प्रमुख प्रा अर्चना कोते व इतर सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय खेळाडू व पंच अभिजीत देशमुख, पवन खोडे, युवराज शेलार, अनिकेत देशमुख, रोहित भामरे, भावेश नांद्रे व नाशिक जिल्हा नेटबॉल संघटना प्रेमी व इतर हितचिंतकांनी श्रावणीचे अभिनंदन केले आहे.