छत्रपती संभाजीनगर ः आयसीएआय आणि विकासाची छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे ५ आणि ६ जुलै रोजी आयसीएआय भवन, गट क्रमांक ७२, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे दोन दिवसीय मेगा विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेचे उद्घाटन सत्र ५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सुरू होईल. तसेच अध्यक्ष, अभ्यास मंडळ – ऑपरेशन्स, सीए डॉ. रोहित रुवातिया आणि उपाध्यक्ष अभ्यास मंडळ – ऑपरेशन्स, सीए संजीब सांघी आणि परिषदेचे संचालक सीए उमेश शर्मा यांच्यासह मेळाव्याला संबोधित करतील.
कार्यक्रमात मुंबई, हैदराबाद, पुणे, दिल्ली, झारखंड, तामिळनाडू आणि छत्तीसगड येथील विविध पेपर प्रेझेंटर्स आणि छत्रपती संभाजीनगर येथील तांत्रिक अध्यक्ष उपस्थित राहतील.
या परिषदेत भारतातील सर्व प्रसिद्ध वक्ते विविध विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी येतील. वक्ते सीसीएम सीए जय छैरा, सीए विजय सारडा, सीए ऋषभ जैन, सीए अझफर खान आणि सीए साई चरण हे आहेत. छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष सीए महेश इंदानी आणि विकासा अध्यक्ष सीए समीर शिंदे यांनी सर्व सीए विद्यार्थ्यांना या परिषदेचा लाभ घेण्याचे आणि नवीन शिक्षण धोरण समजून घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती आयसीएआय भवन (९४२०१३४६०५, ९०९६१६२३५२) येथे संपर्क संपर्क साधावा.