
नागपूर ः राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नागपूरच्या नऊ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र तलवारबाजी संघटना आणि नाशिक तलवारबाजी संघटना यांच्यातर्फे ५ ते ७ जुलै या कालावधीत १७ वी मिनी आणि सहावी बाल राष्ट्रीय अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नागपूरचे ९ तलवारबाज सहभागी होतील. नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
१० वर्षांखालील गटात वैदेही बनकर (फॉइल इव्हेंट), पूर्वा धोटे (फॉइल इव्हेंट) हे सहभागी होतील. १२ वर्षांखालील गटात ईशा खडतकर (फॉइल इव्हेंट), दिव्यंशी धारपुरे (सायबर इव्हेंट), काव्या शिर्के (एपी इव्हेंट), श्रेया पुसनाके (एपी इव्हेंट), विहाना सुरकर (फॉइल इव्हेंट), अद्विक बनसोड (फॉइल इव्हेंट), अनन्या माने (सायबर इव्हेंट), गौरल क्षीरसागर (सायबर इव्हेंट) या खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
सर्व खेळाडूंना प्रशिक्षक राहुल मांडवकर, सागर भगत, आवेश सोमकुंवर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नागपूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अजय सोनटक्के, सचिव मोहम्मद शोएब आणि कोषाध्यक्ष सुरेश हजारे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.