राज्य सेपक टकरॉ स्पर्धेत नांदेड संघाला रेगू इव्हेंटमध्ये विजेतेपद 

  • By admin
  • July 3, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

नांदेड ः महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व सेपक टकरॉ असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी महाराष्ट्र राज्य सिनियर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धा नाशिक येथे उत्साहात झाली. या स्पर्धेत नांदेड संघाने रेगू इव्हेंटमध्ये विजेतेपद पटकावले तर टीम इव्हेंट व डबल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकले. 

या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या संघाने अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत रेगु इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक पटकाविले तर टीम इव्हेंट मध्ये ब्राँझ आणि डबल इव्हेंट मध्ये ब्राँझ पदक प्राप्त करून ३५वी सीनियर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेचे विजेतेपद व ब्राँझ मेडल पटकावले.

नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. मुलांच्या विजयी संघात सुदेश कांबळे (कर्णधार), असंग जोंधळे, रोहित सूर्यवंशी, क्षितिज सूर्यवंशी, आर्यन केशेट्टीवार, आनंद पंडित, निशांत कदम, रोहन फड, आदित्य खडसे, शिवकुमार मंगरुळे, देवानंद जागणे, नागेश तुरुकमाने, माधव कोळगाणे, पवन अंभोरे, महेश शिंदे आदी खेळाडूंचा समावेश आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंना रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामदार, राज्य संघटनेचे सचिव डॉ योगेंद्र पांडे, कोषाध्यक्ष डॉ ललित जिवानी, राज्य संघटनेचे अमृता पांडे, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण कुमार कुपटीकर, वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव डॉ विनय मुन, परभणी जिल्हा संघटनेचे सचिव गणेश माळवे, इक्बाल मिर्झा आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *