
छत्रपती संभाजीनगर ः १ जुलै या दिवशी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तसेच दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांकडून अंबेलोहळ येथे कृषी दिन व वृक्षारोपण आणि वसंतराव नाईक यांची जयंती हा कार्यक्रम साजरा करण्यात आला
तसेच कार्यक्रमाला मार्गदर्शन प्राचार्य प्रा एस एस बैनाडे कार्यक्रम अधिकारी प्रा एस बी बडे व प्रा एस व्ही गुंड, शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा हिरामन व शिक्षक वृंद कार्यक्रमाचे आयोजन करणारे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत आदित्य उगले, तेजस रिठे, हर्षल सोमवंशी,कार्तिक वाणी, उद्धव ठोंबरे,कार्तिक शिंदे, उद्धव बरबडे,अशोक खांडेकर, गणेश वायाळ उपस्थित होते.