
सोलापूर ः हाँगकाँग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अनिमेश कुलकर्णी यांनी रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबला भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार क्लबचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थापक मल्लिनाथ याळगी, कमांडर अशोक कुमार मनचंदा, कोच तुषार सोण्णके आदी उपस्थित होते. यावेळी रागिनी क्लबच्या वतीने हाँगकाँगला सामने खेळण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. विजय बिराजदार यांनी आभार मानले.
अनिमेश कुलकर्णी म्हणाले की, घरगुती काम करणाऱ्या मुली व महिलांना एकत्रित करुन क्रिकेट प्रशिक्षण दिले. २०१७ मध्ये हाँगकाँग ॲकेडमीची स्थापना केली. दहा मुली फिलिपाईन्स नॅशनल खेळून रौप्य मिळवले.