
ठाणे ः माथेरान व्हॅली स्कूलमध्ये वारकरी संप्रदाय अगदी वेशभूषेत सामील झाला होता. वेगवेगळ्या संतांच्या भूमिकेत प्री- प्रायमरीच्या मुला-मुलींनी वेश परिधान करत संतांची भूमिका पार पडली. तसेच अनेक अभंगांवर व विठ्ठलाच्या गाण्यांवर नाचत डुलत शाळेत प्रवेश केला होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका, सुवरवायझर, मनीषा मॅडम तसेच शिक्षक वर्ग या सर्वांनी एकत्र येऊन विठुरायाचे पूजा पाठ करत दर्शन घेऊन मुलांच्या आनंदात सामील झाले होते. मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. यावेळी विठुरायाची महिमा सांगितली गेली. छोट्या छोट्या मुला-मुलींनी विठुरायाची महिमा व संतांचे संतप्रेम व गाथा इतरांना समजून सांगितली. तसेच वंजार पाडा गावातील परिसरात विठुरायाची महिमा सांगत वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले होते व इतरांनाही गावातील व्यक्तींना विठुरायाची महिमा सांगत वारी पूर्ण केली या वारीमध्ये स्कूलच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल, मीना अंबोरे आणि कुंदा पाटील तसेच प्री-स्कूलचे प्रमुख आदी उपस्थित होते.