
कर्जत ः अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्टचे शारदा मंदिर मराठी माध्यमाच्या वतीने दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा दहिवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी भजन, टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी शारदा मंदिर (कर्जत) मराठी माध्यमातर्फे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्टचे शारदा मंदिर मराठी माध्यमाच्या वतीने दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा दहिवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी भजन, टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले. या वेळी परिसरातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देशमुख, दिविजा पुरोहित, विघ्नेश देशमुख व जयदिप राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक तेजस्वी शिंदे, श्रद्धा जामघरे, रूपाली देशमुख, चेतना महांगडे, मोहिनी मुलगीर, सौरभ गुरव व विजय सावंत, कांता नागरे, ऋतुजा रुमडे यांनी केले. कार्यक्रमाचे कौतुक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे व संस्थेचे अध्यक्ष दिनानाथ पुराणिक तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले.
तसेच शाळेतील शरद उतेकर, निशा गाढे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी परिसरातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.