
देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित डी बी देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सदानंद मोहोळ संघाने सदू शिंदे संघावर २०९ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात मिझान सय्यद याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
सदानंद मोहोळ आणि सदू शिंदे यांच्यात तीन दिवसांचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सदानंद मोहोळ संघाने शानदार कामगिरी नोंदवत २०९ धावांनी विजय साकारला.
या सामन्यात मिझान सय्यद याने १२१ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याने १३ चौकार व चार षटकार मारले. उबेद खान याने ८५ चेंडूत ९१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. त्याने १२ चौकार व २ षटकार मारले. मेहूल पटेल याने ९६ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने १ षटकार व १२ चौकार मारले.
गोलंदाजीत नदीम शेख याने प्रभावी गोलंदाजी टाकली. त्याने २८ धावांत सहा विकेट घेऊन सामना गाजवला. मनोज इंगळे याने ३९ धावांत चार गडी बाद केले. शुभम माने याने ६० धावांत तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
सदानंद मोहोळ इलेव्हन ः पहिला डाव – ७८.५ षटकात सर्वबाद ३२६ (दिग्विजय पाटील ४४, हर्षल हाडके १५, मेहूल पटेल १२, अभिषेक पवार १४, मंदार भंडारी ५७, मिझान सय्यद नाबाद १२१, सत्यजीत बच्छाव ३८, मनोज इंगळे ४-३९, अक्षय वाईकर २-४१, निमीर जोशी २-४८).
सदू शिंदे इलेव्हन ः पहिला डाव – ४३.४ षटकात सर्वबाद २१४ (सिद्धांत दोशी २०, ऋषिकेश सोनवणे ५५, उबेद खान ९१, रवींद्र जाधव २८, नदीम शेख ६-२८, अभिषेक निषाद २-४५).
सदानंद मोहोळ इलेव्हन ः दुसरा डाव – ६८.१ षटकात सर्वबाद ३६३ (दिग्विजय पाटील ६६, यश क्षीरसागर २८, मेहूल पटेल ८३, मिझान सय्यद ३०, मंदार भंडारी ७७, सत्यजीत बच्छाव २७, योगेश चव्हाण १७, शुभम माने ३-६०, अक्षय वाईकर ३-५७, निमीर जोशी २-४०, प्रशांत सोळंकी २-५७).
संदू शिंदे इलेव्हन ः दुसरा डाव – ६३.१ षटकात सर्वबाद २६६ (श्रीपाद निंबाळकर १३, सौरभ दरेकर ६०, ऋषिकेश सोनवणे १२, उबेद खान ४५, अभिनव तिवारी २७, शुभम माने २७, रवींद्र जाधव २३, मनोज इंगळे २४, प्रशांत सोळंकी १२, निकित धुमाळ २-१३, अभिषेक निषाद २-४८, शुभम कदम २-४०).