< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणाची उत्तम कामगिरी – Sport Splus

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणाची उत्तम कामगिरी

  • By admin
  • July 8, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

नाशिक ः महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डीएसएफ स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजीत सातव्या चाईल्ड कप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड आणि महाराष्ट्रच्या खेळाडूंनी विविध प्रकारामध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकावले.

हरियाणाचे वर्चस्व

दहा वर्षे मुलांच्या गटामध्ये फॉईल प्रकारात हरियाणाच्या खेळाडूंनी वर्चस्व सिद्ध करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या पहिल्या तीन क्रमांकावर आपले नाव कोरले. यामध्ये हरियाणाच्या उज्वला रावतने सुवर्ण, तेजस सैनी हिने रौप्य तर समक्षाने कांस्य पदक मिळविले. या गटात दिल्लीच्या अद्वय अग्रवाल याने कांस्य पदक मिळविले.

दहा वर्षे मुलींच्या सॅबर प्रकारात झारखंडच्या ओरान शिक्षा हिने अंतिम लढतीत तामिळनाडूच्या जे व्ही आकांक्षाचा ९-७ असा पराभव करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. या गटामध्ये केरळच्या इग्निशस निर्णया आणि पंजाबच्या गणीवीकौर बेन्स यांनी संयुक्त कांस्यपदक मिळविले. याच गटामध्ये मुलींच्या फॉईल प्रकारात महाराष्ट्राच्या शुभांगी शरण्या आणि आंध्र प्रदेशच्या वागिरी विस्मया यांच्यात अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत ७-७ अशी बरोबरी असतांना शेवटच्या अर्ध्या मिनिटात वागिरी विस्मयाने आक्रमक पावित्रा घेत एक गुण मिळवत ही लढत ८-७ अशा केवळ एक गुणाने जिंकून सुवर्णपदक मिळवले.

महाराष्ट्राच्या शुभांगीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात महाराष्ट्राच्या आरन्या सिन्हा आणि आंध्र प्रदेशच्या अन्या कांदिका यांनी संयुक्त कास्य पदक मिळविले.

प्रमुख पाहुणे रेश्मा राठोड, सुधाकर बडगुजर, अजय बागुल, श्वेता चंडालिया, मुख्याध्यापक संजय वाघ, लोहित विजय, आरती गायखे, अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे यांच्या हस्ते पदक विजेत्यांना आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *