
ठाणे ः ठाणे शहरात यंग इंडिया मिनीथाॅन स्पर्धेचे आयोजन शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
चांगल्या आरोग्यासाठी धावणे गरजेचे आहे यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केले. या प्रसंगी समन्वयक डॉ एकनाथ सोपान पवळे, संजय देशमुख (उपाध्यक्ष) कार्यकारिणी सदस्य स्वप्नील चव्हाण, अमेय देशपांडे, सिद्धेश पुंडे, ओमकार देशमुख, गणेश सामंत व सार्थक कदम उपस्थित होते. सदर स्पर्धा १० विविध गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी २५ जुलैपर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे. सदर स्पर्धेचा प्रारंभ वृंदावन बस स्थानका येथून होणार आहे.
देविदास निकम यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्तुत यंग इंडिया मिनीथाॅन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष दत्ता चव्हाण, मनोहर निकम, अक्षता पंगम, नरेश कदम, राम हळवी, समीर चव्हाण, अभिषेक कदम, आदी उपस्थित होते.